हॅकेथॉन (Hackathon)

 
                                                            

                                                
महाराष्ट्रराज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर.

हॅकेथॉन (Hackathon) जिल्हास्तरीय कार्यशाळा

हॅकेथॉन म्हणजे काय ?

> हॅकेथॉन हा शब्द "हॅक" आणि "मॅरेथॉन" चे संयोजन आहे. म्हणजेच हॅकर्ससाठी मॅरेथॉन.

> हॅकेथॉन हा एक स्पर्धात्मक कार्यक्रम आहे.

> विशिष्ट समस्या समस्या सोडवण्यासाठी किंवा नवीन संधी ओळखण्यासाठी स्पर्धक एकत्र येतात. हॅकेथॉन सहभागी व्यक्ती एकमेकांशी संवाद साधतात आणि आपल्या नवनिर्मितीचे सादरीकरण करतात.

हॅकेथॉनचे आयोजन -

STARS (Strengthening Teaching-Learning and Results For States) प्रकल्पातील प्रकरण ५.१ Career Mela & Hackathon यानुसार महाराष्ट्रात प्रथमच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यातर्फे हॅकेथॉन २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले आहे.

हॅकेथॉन कशासाठी ?

> विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मितीची मानसिकता निर्माण करण्यास २१ व्या शतकातील कौशल्यांची रूजवणूक व्हावी यासाठी हॅकेथॉन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

> चिकित्सक विचार (Critical Thinking), सर्जनशीलता (Creativity), सहयोग (Collaboration) व संवाद (Communication) अशी २१ व्या शतकाची चार कौशल्ये असून त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP) नमूद केलेली आत्मविश्वास (Confidence) व करूणा (Compassion) अशी दोन कौशल्ये जोडलेली आहेत.

हॅकेथॉन -

> स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय व शासकीय अनुदानित शाळेतील इयत्ता सहावी ते आठवीचे विद्यार्थी.

> दोन विद्यार्थी व एक मार्गदर्शक शिक्षक याप्रमाणे एक गट.

एका शाळेतील जास्तीत जास्त तीन गट सहभागी.

> राष्ट्रीय शि क्षण धोरण २०२०, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २०२३, युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स (UNSDGS) यामध्ये नमूद केलेल्या महत्वाच्या विषयान्वये निवडण्यात आलेल्या १५ विषयांवर/Themes विद्यार्थ्यांनी प्रतिकृती करणे अपेक्षित आहे.

 

हॅकेथॉनचे विषय (Themes)

१. आरोग्य २. कृषी३. वाहतूक व दळणवळण ४. दर्जेदार शिक्षण ५. पर्यावरणपूरक जीवनशैली

६. नागरी विकास रचना ७. पर्यटन ८. संगणकीय विचार ९. स्वच्छता १०. अन्न आणि पोषण

११. परवडणारी व स्वच्छ ऊर्जा १२. लिंग समभाव१३. सांस्कृतिक वारसा १४. प्रदूषण

१५. डिजिटल सुरक्षा

अशा १५ विषयांचा समावेश आहे

हॅकेथॉनचे टप्पे -

१. समावेशित विषयाबद्दल माहिती (Theme announcement)

२. नोंदणी व संघ तयार करणे (Registration and team formation)

३. कल्पना तयार करणे व कार्यान्वित करणे. (Idea generation & pitching)

४. मार्गदर्शन व कार्यशाळा (Mentoring and workshops)

५. मूल्यमापन (पिचिंग आणि जजिंग)

६. स्पर्धा व ओळख निर्मिती (Awards and recognition)

 

 

 

हॅकेथॉनची अंमलबजावणी -

१. जिल्हास्तरीय प्रदर्शन जिल्हास्तरावर प्रतिकृतींचे प्रदर्शन

२. प्रति जिल्हा प्रथम ३ प्रतिकृतींची निवड

३. राज्यस्तरीय प्रदर्शन १०८ प्रतिकृतींचे सादरीकरण

४. निवडक प्रतिकृतींना पारितोषिक वितरण

हॅकेथॉनची नोंदणी करण्यासाठी लिंक

https://maa.ac.in/SCERTMahaHackathon