बडबडगीते
शाळेतील मुलांनी एकत्रीत गायिलेली बडबडगीते
अडगुलं मडगुलं सोन्याचं कड्गुल
रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू

एवढा मोठ्ठा भोपळा
आकाराने वाटोळा
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले लाडू
लाडू झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ

येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठ्ठा

येग येग सारी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून

चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्या झाडामागे लपलास का
निम्बोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खावून जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी

एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ..!
तिकडून आली बस...
बसमध्ये बसलं,
तिकीट नाही काढलं....
तिकीटचेकरने पाहीलं,
चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!