ई -लर्निंग

ई -लर्निंग सेल्फ लर्निंग एज्युकेशन व्हिडीओ  प्लेयर (Self Learning Educational Video Player) 

                 

आदरणीय ,

विद्यार्थी -पालक -शिक्षक बंधू  भगिनींनो आज आपली मूलं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेत आहेत . नवा शिक्षणाचा कायदा -बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९अन्वये बदललेल्या  मूल्यमापन (परीक्षा)पद्धतीच्या शर्यतीत व माहिती तंत्रज्ञानाच्या स्पर्धेच्या युगामध्ये आपली मुलं अभ्यासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनून उज्वल यश संपादन करू शकतील ,या उदेशाने इतर शैक्षणिक संदर्भ साहित्य तसेच शिक्षक विद्यार्थी यांच्या अनमोल परिश्रमातून सेल्फ लर्निंग एज्युकेशन व्हिडीओ  प्लेयर (Self Learning Educational Video Player) आपल्यासमोर सादर करीत आहे .

हा एक शैक्षणिक म्युझिक प्लेयर आहे .प्रत्येक इयत्तेच्या   सर्व विषयाचा तालासुरात -संगीतमय -शिक्षणाचा समावेश असलेला ,शिक्षक विद्यार्थी अंतरक्रियेचा समावेश व आपल्या मुलांना स्वतः हून घरच्या घरी  अभ्यास करण्यासाठी सहज प्रवॄत्त करेल . हव्या त्या वेळेला हवा तो विषय अगदी टयूशन न लावता फक्त समोरील नंबराच  बटन दाबून शिकवणारे यंत्र आहे . शिक्षकानांही वर्गात शिकवण्यासाठी उपयुक्त .