किल्ले


किल्ले

 राजगड, रायगड, शिवनेरी, तोरणा, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर, लोहगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा, विशाळगड इ. महत्त्वाचे किल्ले छत्रपती शिवाजीच्या स्वराज्यात होते.
शिवाजीचा जन्म शिवनेरी गडावर झाला. त्यांनी प्रथम जिंकलेला किल्ला तोरणा होय. राजगड ही मराठी राज्याची पहिली राजधानी होती. नंतर रायगड झाली. राजगड हा किल्ला शिवाजीने स्वतः बांधून घेतला. त्यापूर्वी त्या शहामृग नावाच्या डोंगरावर मुरुंबदेवाचे(ब्रह्मदेवाचे) देऊळ होते. ते देऊळ अजूनही राजगडाच्या बालेकिल्ल्यावर आहे. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणार्‍या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:


 टिप्पणी पोस्ट करा